breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराष्ट्रिय

पै. राष्ट्रीय खेळाडू प्रगती गायकवाड हीचा नीता ढमाले यांच्या हस्ते गौरव

  •  राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पिंपरी- चिंचवडचा लौकिक
  •  नंदादीप प्रतिष्ठानकडून कौतुकाची थाप

पिंपरी | प्रतिनिधी

झारखंड रांची येथील खेलगाव येथे गणपतराव स्टेडियममध्ये 14 ते 17 डिसेंबर 2021 दरम्यान झालेल्या कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहराची महिला पैलवान राष्ट्रीय खेळाडू प्रगती गायकवाड हिने 54 किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले. याबद्दल नंदादीप प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा नीता ढमाले यांनी पैलवान प्रगती गायकवाडचा सत्कार केला.

प्रगतीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत भारत देशात तिच्या वजनगटात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पैलवान प्रगतीच्या वजन गटात 18 राज्यांच्या महिला कुस्तीगीर होत्या. प्रगतीने सर्व कुस्त्या तुफानी केल्या. पहिल्या फेरीत पंजाबची महिला पैलवान ख्वाईश हिला गुणफलक 10 – 0 ने हरवले. दुसऱ्या फेरीत चंदीगडची महिला पैलवान काजल हिला देखील गुणफलक 10- 0 ने हरवले. उपांत्य फेरीत दिल्लीची महिला पैलवान सिमरन हिच्याबरोबर झालेल्या चित्तथरारक लढतीत सिमरनला गुणफलक 8 – 5 ने हरवले. सेमी फायनल कुस्ती लढतीत हरियाणाची महिला पैलवान मुस्कानला एकतर्फी चितपट करत अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला.

पैलवान प्रगतीने अंतिम सुवर्णपदकाच्या कुस्ती लढतीत उत्तर प्रदेशची महिला पैलवान लिझा तोमर हिच्याबरोबर झालेल्या लढतीत तोमरवर 3 – 2 ने आघाडी घेतली. शेवटच्या दहा सेकंदात पैलवान प्रगती हिने एका गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले.

कुमार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पिंपरी चिंचवड शहरात अशी कामगिरी करणारी पैलवान प्रगती ही एकमेव खेळाडू ठरली आहे. प्रगतीने आतापर्यंत पाच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा खेळल्या आहेत. सलग तीन वर्ष राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदकांची हॅट्रिक केली आहे. प्रगती हिने शहराला महिला कुस्ती वर्गातून 2017 – 18 ला पहिले राष्ट्रीय पदक दिले आहेत. प्रगती ही प्रेरणा माध्यमिक विद्यालय कॅम्प एज्युकेशन निगडी येथे अकरावी मध्ये शालेय शिक्षण घेत आहे.

पैलवान प्रगती गायकवाडचे पालक विनोद गायकवाड म्हणाले, “नीता ढमाले करीत असलेल्या आर्थिक सहकार्याने व पै. अमोलभाऊ बुचडे यांच्या अशिर्वादाने महिला पैलवान प्रगती गायकवाड हिची 14 ते 17 डिसेंबर रोजी रांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी तिची निवड झाली आहे. 54 किलो वजन गटात तिने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. प्रगतीला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button