पिंपरी / चिंचवड

‘रेड स्वस्तिक’च्या मानवतावादी आरोग्य उपक्रमांनी भारावून गेलो – अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे

– ‘रेड स्वस्तिक’चा 21 वा वर्धापन दिन उत्साहात

पिंपरी | प्रतिनिधी

‘रेड स्वस्तिक’ ठिकठिकाणी राबवत असलेले आरोग्य उपक्रम अतिशय चांगले आहेत. रेड स्वस्तिकच्या या मानवतावादी आरोग्य उपक्रमांनी मी भारावून गेलो आहे, असे उद्गार पिंपरी चिंचवडचे अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी काढले.

मानवतावादी आरोग्य क्षेत्रात कार्यरत ‘रेड स्वस्तिक’चा 21 वा वर्धापन दिन मोशीतील हॉटेल मोशी ग्रँड हॉटेलमध्ये बुधवारी (दि. 12) संपन्न झाला. यावेळी डॉ. संजय शिंदे बोलत होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, माजी पोलीस महासंचालक तथा रेड स्वस्तिकचे संस्थापक डॉ. टी. एस. भाल, अखिल भारतीय अध्यक्ष सुरेश कोते, माजी पोलीस आयुक्त चंद्रकांत कुंभार, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, सह महाव्यवस्थापक अशोक शिंदे, रोशन मराठे या कार्यक्रमाचे संयोजक तथा जिल्हाध्यक्ष संतोष बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांचा कार्यक्रमात सन्मान सोहळा संपन्न झाला. यामध्ये जन्मतः अपंगत्व असलेल्यांना सक्षम करणारे मुंबईचे प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. अमित जैन, डॉ. राजेश पांचाळ, प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. निशित अग्नी, मुंबईच्या प्रसिद्ध आरोग्यसेविका पिंकी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, शिवाजीराव गवारे, सहाय्यक आयुक्त श्रीयुत भोसले, सहाय्यक परिवहन अधिकारी आर. एन. पाटील, भैरव हॉस्पिटलचे अनिल जैन, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे विजय पाटील, शंकर मोहिते, डॉ. अनिल रोडे, गणेश पाटील, जे. बी. पाटील, राजेंद्र अंजनकर, विकास साने यांच्यासह अनेक मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात रेड स्वस्तिकचे सह महाव्यवस्थापक रोशन मराठे यांनी यानंतर आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्यभर मोफत सेवा देणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमाचे आयोजक व जिल्हाध्यक्ष संतोष बारणे यांनी मोशी परिसरात डायलेसिससह विविध अत्याधुनिक सेवा उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केले.

सह महाव्यवस्थापक अशोक शिंदे, अखिल भारतीय अध्यक्ष सुरेश कोते यांनी मनोगत व्यक्त करून विविध उपक्रमांची माहिती दिली. मुख्य अतिथी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करून पोलिसांच्या सहकार्याने विविध आरोग्य उपक्रम राबवावेत असे आवाहन केले. केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे राज्याध्यक्ष विजय पाटील यांनी रेड स्वस्तिक सोबत महाराष्ट्रभर प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग व मोफत औषधी उपलब्ध करून देणार असल्याचे जाहीर केले.

या सोहळ्यास संस्थापक डॉ. टी. एस. भाल यांनी ही लोक चळवळ करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले. डॉ. बबन डोळस यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध आरजे अक्षय व शोभा कुलकर्णी यांनी केले. रेड स्वस्तिक सोसायटीच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी डॉ. उमाकांत वाबळे, राजेश सोमवंशी, नंदू रायगडे, सचिन बारणे, ओम प्रकाश बहिवाल, श्रीकांत देशमुख, अश्विनी वंधारे, गणेश पाटील यांच्यासह अनेक सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button