ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘मुलाचा खेळण्याचा हक्क’ अंतर्गत मांजरे विद्यालयात विविध खेळांचे आयोजन

पिंपरी चिंचवड | मुलांना सर्व भेद विसरूण एकत्र खेळता यावे, या हेतूने वसंतराव मारुतीराव मांजरे विद्यालय, मांजारेवाडी येथे ‘मुलाचा खेळण्याचा हक्क’ अंतर्गत विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. टेरे डेस होम्स आणि वर्क फॉर इक्वॅलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.19) या उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मुलांनी उत्सहाने विविध खेळात सहभाग घेत मौजमजा केली.कार्यक्रमात मुलांना खोखो कबड्डी, रिले या खेळाव्यतिरीक्त कराटे, कसरतीचे खेळ अशा खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले व प्रोत्साहित केले. यावेळी अंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू प्रज्वल दाभाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, रोहिदास शिर्के, प्रगती शिर्के, नितेश चव्हाण आणि वैभवी पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मुलांच्या मनात एकमेकांविषयी आदर निर्माण व्हावा. मुलींवर होणारी हिंसा, भेदभाव कमी होऊन सुदृढ समाजाची निर्मिती व्हावी हा उपक्रमाचा उद्देश आहे. वर्क फॉर इक्वॅलिटी ही संस्था शिरोली, खरपुडी खुर्द, मांजरेवाडी, होलेवाडी, रेटवडी, निमगाव या गावातील आणि आदिवासी वाड्या वस्त्यावरील 300 बालगोपाळांसोबत नियमित मैदानी खेळ घेते. मुलांचा खेळण्याचा उत्साह वाढवा यासाठी गावात स्पोर्ट क्लब देखिल स्थापन करण्यात आला आहे.’ अशी महिती वर्क फॉर इक्वॅलिटी संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास यांनी दिली.

निलांबरी कांबळे, दिव्या गिरी, सूरज कांबळे, रसिका गावडे आणि संजीवनी कांबळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button