क्रिडाताज्या घडामोडी

न्यूझीलंड विरुद्धच्या T20 मालिकेसाठी ऋतुराज गायकवाडला संधी

भारतीय संघाचे T20 वर्ल्डकप मधील आव्हान संपुष्टात आले आहे. भारतीय संघ येत्या 17 नोव्हेंबर पासून न्यूझीलंड विरुद्ध तीन T20 सामने खेळणार आहे. नवीन कर्णधार आणि नवीन प्रशिक्षकासह या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी संघात पिंपरी चिंचवडचा धडाकेबाज फलंदाज ऋतुराज गायकवाडची निवड करण्यात आली आहे.भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांची निवड केल्यानंतर तसेच, रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर दोघांचा हा पहिलीच सिरिज असेल. त्यामुळे दोघांच्याही कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. या सामन्यांसाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली असून, आवेश खान, दीपक चहर आणि हर्षल पटेल यांना संधी देण्यात आली आहे.

ऋतुराज गायकवाडने आयपीएलच्या या मोसमात स्फोटक फलंदाजी करत चेन्नई सुपरकिंग्जच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. तसेच, यापूर्वी श्रीलंकासोबत झालेल्या मालिकेत देखील ऋतुराज गायकवाड याला संधी देण्यात आली होती. मात्र या मालिकेत तो मैदानात उतरला नव्हता. आता पुन्हा एकदा त्याचा न्यूझीलंड विरुद्ध मालिकेसाठी त्याचा संघात समावेश केला असून, त्याचा स्फोटक अंदाज पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे.

असा आहे संघ

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उप कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, ईशान किशन, वेंकटेश अय्यर, यजुवेंद्र चहल, आर. अश्विन, आवेश खान, दीपक चहर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड T20 मालिकेचे वेळापत्रक

17 नोव्हेंबर – जयपूर

19 नोव्हेंबर – रांची

21 नोव्हेंबर – कोलकता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button