breaking-newsटेक -तंत्र

Oppo Reno 4 Pro झाला लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Oppo कंपनीचा Reno 4 Pro हा मोबाईल हिंदुस्थानात लॉन्च झाला आहे. या मोबाईलचे वैशिष्ट्य म्हणजे या फोनचा चार्जर vooc असून त्यामुळे मोबाईल लवकर चार्ज होतो. तसेच फोटो प्रेमींसाठी कंपनीने काही खास फीचर आणले आहेत.

https://twitter.com/oppomobileindia/status/1289103503336456193?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1289103503336456193%7Ctwgr%5E&ref_url=https%3A%2F%2Fwww.saamana.com%2Foppo-reno-4-pro-launch-in-india%2F

कॅमेरावर विशेष लक्ष

फोटोसाठी Reno 4 Pro मध्ये चार कॅमेरे असणार आहे. त्यातला पहिला कॅमेरा 48 मेगापिक्सलचा असून त्याचा सेन्सर Sony IMX586आहे. तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल असून अल्ट्रा वाईड आहे. तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल मॅक्रो आणि चौथा कॅमेरा 2 मेगापिक्सेल मोनो लेन्स असणार आहे.

तर सेल्फीसाठीचा फ्रंट कॅमेरा हा 32 मेगापिक्सल असणार आहे. तसेच फ्रंट कॅमेरामध्ये अल्ट्रा नाईट सेल्फी मोड फीचरही असणार आहे.

मोबाईलची स्पेसिफिकेशन

नव्या Reno 4 Pro फोनमध्ये साडे सहा इंच फूल एचडी स्क्रीन अस्णार आहे. त्यात फिंगरप्रिंट सेन्सरही असणार आहे. यात क्वालकॉम 720G स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असणार आहे. तर फोन लेटेस्ट 10 अँड्रॉईड वर्जन असून ColorOS 7.2चा त्यात समावेश आहे.

किंमत आणि उपलब्धता
या फोनची किंमत 34 हजार 990 रुपये इतकी आहे. फोनमध्ये Starry Night आणि Silky White असे दोन पर्यात आहेत. हा फोन ऍमेझॉन, फ्लिपकार्ट्म पेटीएम मॉल आणि स्नॅपडीलवर 5 ऑगस्टपासून विक्रीसाठी मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button