ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात केवळ 146 सोसायट्यांनी उभारला कम्पोस्टिंग प्लाण्ट

पिंपरी चिंचवड |  पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील मोठ्या हौसिंग सोसायट्यांना कम्पोस्टिंग प्लाण्ट सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शहरातील केवळ 146 हौसिंग सोसायट्यांनी कंपोस्टिंग प्लाण्ट उभारला आहे, तर 480 हौसिंग सोसायट्यांनी या प्रकल्पाकडे पाठ फिरविली आहे.महापालिकेने दीड महिन्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर कचरा उत्पन्न करणाऱ्या हौसिंग सोसायट्यांनी ओला, सुका आणि घरगुती घातक कचरा विलगीकरण करावा, तसेच ओल्या कचऱ्यावर स्वतःच्या परिसरामध्ये कंपोस्टिंग करावे असे बंधनकारक केले, परंतु शहरातील 626 हौसिंग सोसायट्यांपैकी 146 सोसायट्यांनी सध्या कंपोस्ट प्लाण्ट कार्यान्वित केले आहेत. 480 हौसिंग सोसायट्यांकडे कम्पोस्टिंग प्लाण्ट नाहीत. त्यानुसार शहरात केवळ 23 टक्के सोसायट्यांकडेच प्लाण्ट आहे.

अ क्षेत्रीय कार्यालयातील 28 सोसायट्यांपैकी 18 सोसायट्यांमध्ये कंपोस्ट प्लाण्ट आहे, तर ब क्षेत्रीय कार्यालयातील 47 पैकी 12 सोसायटींमध्ये प्रकल्प आहे, तसेच क क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकूण 80 सोसायट्या आहेत. त्यापैकी केवळ 35 सोसायट्यांमध्ये कंपोस्ट प्लाण्ट आहे. ड क्षेत्रीय कार्यालयातील 296 सोसायट्या आहेत. त्यातील केवळ 54 सोसायट्यांत प्रकल्प आहे. ई क्षेत्रीय कार्यालयातील 76 सोसायट्यांमधील 5 सोसायट्या म्हणजेच खूपच अत्यल्प प्रमाणात कचरा कंपोस्टिंग करण्यात येत आहे.

ग क्षेत्रीय कार्यालयातील 79 सोसायट्यांपैकी 7 सोसायट्यांमध्ये हा प्रकल्प सुरू आहे. फ क्षेत्रीय कार्यालयातील 11 पैकी 9 सोसायटी कचरा कंपोस्ट होत आहे, तर ह क्षेत्रीय कार्यालयातील सोसायट्यांपैकी 6 सोसायट्यांमध्ये ओला कचरा कंपोस्ट करण्यात येत आहे. आयुक्तांनी डिसेंबरअखेर मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्यांना कम्पोस्टिंग प्लाण्ट उभारण्याचे आदेश काढले आहेत, परंतु ज्या सोसायट्या कचरा विलगीकरण करून कम्पोस्टिंग करत नाहीत अशा एकाही सोसायटीवर अद्यापि कार्यवाही केलेली नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button