पिंपरी / चिंचवड

गुन्हे शाखेचे पोलीस असल्याचे सांगून एकास ठगवले

पिंपरी l प्रतिनिधी

आम्ही क्राईम ब्रांचची माणसे आहोत, असे सांगून दोन अनोळखी व्यक्तींनी एका नागरिकाला त्याचाकडील दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले. ते दागिने हातचलाखीने पळवून नेत व्यक्तीची फसवणूक केली. हा प्रकार बुधवारी (दि. 16) दुपारी बारा वाजता चाकण नगरपरिषद कार्यालयासमोर घडला.

शंकर नारायण भुजबळ (वय 50, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चाकण नगरपरिषद कार्यालयासमोर एका झाडाखाली थांबले होते. त्यावेळी तिथे दोन अनोळखी व्यक्ती आले. आम्ही क्राईम ब्रांचची माणसे आहोत, असे सांगून फिर्यादी यांच्या बोटातील अंगठ्या रुमालात काढून ठेवण्यास सांगितल्या. फिर्यादी यांनी रुमालात अंगठ्या ठेवल्या असता आरोपींनी त्या हातचलाखीने ठकबाजी करून फसवून नेल्या. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button