पिंपरी / चिंचवड

किराणा दुकानातून एक लाख 80 हजारांची रोकड चोरीला

पिंपरी l प्रतिनिधी

एमआयडीसी भोसरी परिसरातील फुलेनगर येथील एक किराणा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 12) रात्री अकरा ते रविवारी (दि. 13) सकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली.

शिदोधन बाबुराव क्रांतिकर (वय 42, रा. महात्मा फुलेनगर, एमआयडीसी भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे महात्मा फुले नगर येथे क्रांती प्रोविजन स्टोअर्स हे दुकान आहे. शनिवारी रात्री अकरा वाजता त्यांनी त्यांचे दुकान कुलूप लाऊन बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दुकान फोडून दुकानातून 60 हजार रुपयांच्या नोटा आणि एक लाख 20 हजारांची नाणी अशी एकूण एक लाख 80 हजारांची रोख रक्कम चोरून नेली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button