पिंपरी / चिंचवड

बावधन येथील स्नॅक्स सेंटर मधून एक किलो गांजा जप्त

पिंपरी l प्रतिनिधी

बावधन येथील एका स्नॅक्स सेंटर मधून पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक किलो 53 ग्रॅम गांजा जप्त केला. दोघांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 14) दुपारी अडीच वाजता करण्यात आली.

लहानू निवृत्ती केदार (वय 35, रा. बावधन  बुद्रुक,ता. मुळशी. मूळ रा. चुंबळी, पो. तांबा राजुरी, ता. पाटोदा, जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लहानू केदार याने राजू सोनवणे नावाच्या व्यक्तीकडून गांजा विक्रीसाठी आणला होता. त्यामुळे राजू सोनवणे याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींच्या विरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लहानू याने राजू सोनवणे याच्याकडून गांजा विकत आणला. तो गांजा बावधन येथील नागेश्वर ती अँड स्नॅक्स सेंटरमधून नागरिकांना विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सोमवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पोलिसांनी स्नॅक्स सेंटरवर छापा मारून कारवाई कारवाई केली. त्यात पोलिसांनी एक किलो 53 ग्रॅम गांजा आणि 500 रुपये रोख रक्कम असा एकूण 23 हजार 825 रुपयांचा गांजा जप्त केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button