पिंपरी / चिंचवड

गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा टपरी मधून विकल्या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने एकास अटक केली आहे. त्याच्यासह त्याला गुटखा पुरवणा-या व्यक्तीविरोधात देखील पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई  बुधवारी (दि. 12) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास पिंपरी गावातील तपोवन मंदिर रोडवर माउली पान शॉप येथे करण्यात आली.

वामन रोहिदास पाटील (वय 43, रा. वाघेरे कॉलनी, पिंपरीगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह मिथुन (पूर्ण नाव माहिती नाही, रा. गणेश पेठ, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी वामन याची पिंपरी गावात पान टपरी आहे. त्याने टपरीमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. याची माहिती पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास पोलिसांनी टपरीवर छापा मारून कारवाई केली.

या कारवाईमध्ये पोलिसांनी टपरीमधून एक लाख 38 हजार 276 रुपये किमतीचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला आहे. आरोपी मिथुन याने वामन याला विक्रीसाठी गुटखा पुरवला असल्याने त्याच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button