पिंपरी / चिंचवड

गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री केल्या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाने एकाला अटक केली आहे. त्याला विक्रीसाठी गुटखा उपलब्ध करून देणा-या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 3) रात्री सव्वा एक वाजता साईनाथनगर निगडी येथे करण्यात आली.

विलास ज्ञानदेव ससाणे (वय 36, रा. रुपीनगर, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह देवराम नेमाराम परमार उर्फ देवा (वय 32, रा. हिंजवडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या दुचाकीवर तसेच नितीन आप्पा सूर्यवंशी यांच्या खोलीत शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवला. याबाबत माहिती मिळाली असता सामाजिक सुरक्षा विभागाने मध्यरात्री सव्वा एक वाजता कारवाई करून आरोपी विलास याला अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी आणि गुटखा असा एकूण दोन लाख 15 हजार 213 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button