पिंपरी / चिंचवड

सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढल्या प्रकरणी एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 23) दुपारी बारा वाजता स्पाईन रोड मोशी प्राधिकरण येथे करण्यात आली.

गणेश बाळू थोरवे (वय 32, रा. आंबेवाडी, उर्से ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक दादा धस यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पाईन रोड मोशी येथील सरदार चौकात आरोपीने गांजा आणि गांजा ओढण्याचे साहित्य बाळगून गांजा ओढला. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करत गणेश थोरवे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 50 रुपयांचा गांजा आणि 20 रुपयांचे साहित्य जप्त केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button