पिंपरी / चिंचवड

गुटखा विक्री आणि पुरवठा करणा-या दोघांवर चिंचवडमध्ये गुन्हा दाखल : एकाला अटक

पिंपरी l प्रतिनिधी

गुटखा विक्री करणा-या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्यासह त्याला गुटखा पुरवणा-या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. १६) दुपारी एक वाजता वाल्हेकरवाडी येथे करण्यात आली.

अशोक राजेंद्रप्रसाद पांडे (वय ४२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) याला अटक केली असून नसीम उस्मान तांबोळी (रा. पर्वती, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पान मसाला साठवून आरोपी अशोक पांडे याने त्याची विक्री केली. याबाबत माहिती मिळाली असता अंमली पदार्थ विरोधी पथकाने शनिवारी दुपारी कारवाई करून १० हजार ३४० रुपयांचा गुटखा जप्त केला. अशोक पांडे याला नसीम तांबोळी याने गुटखा विक्रीसाठी पुरवला यामुळे त्याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button