पिंपरी / चिंचवड

गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

बेकायदेशीरपणे स्वतःकडे गांजा बाळगल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 26) दुपारी साडेतीन वाजता वाघमारे चौक वाकड येथे करण्यात आली.

निलेश रामदास शिंदे (वय 32, रा. वाघमारे चौक, वाकड. मूळ रा. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे चौक येथे राहणा-या एका व्यक्तीकडे गांजा असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी निलेश शिंदे याच्या घराजवळ छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी 337 ग्राम वजनाचा आठ हजार 425 रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button