पिंपरी / चिंचवड

महिला काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन विनयभंग : एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

महिला काम करत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल व्यवस्थापकाला धमकी देत महिलेचा विनयभंग केला. ही घटना रविवारी (दि. 3) रात्री पावणे अकरा वाजता निगडी परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सोमनाथ अंकुश शेलार (वय 33, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत 30 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मागील एक वर्षापासून फिर्यादी महिलेचा बुलेटवरून पाठलाग केला. फिर्यादीकडे पाहून आरोपी इशारे करत होता. रविवारी पावणे अकरा वाजता फिर्यादी काम करत असलेल्या हॉटेलमध्ये आरोपी आला. त्याने हॉटेलच्या व्यवस्थापकाला फिर्यादी महिलेला घेऊन जाण्याबाबत सांगितले. व्यवस्थापकाने आरोपीला अडवले असता त्यास आरोपीने शिवीगाळ केली व धमकी दिली. याबाबत विनयभंगाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button