पिंपरी / चिंचवड
पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
पिंपरी l प्रतिनिधी
बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 13) सायंकाळी भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ करण्यात आली.
मुरारी जोगेश्वर मंडल (वय 35, रा. मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई आशिष गोपी यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पाच वाजता एकजण भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहाजवळ आला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन मुरारी मंडल याला अटक केली. त्याच्याकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा 44 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.