पिंपरी / चिंचवड
पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
पिंपरी l प्रतिनिधी
बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या शस्त्र विरोधी पथकाने एका तरुणाला कस्पटे वस्ती वाकड येथून अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 25) दुपारी करण्यात आली.
ऋषिकेश उर्फ मोन्या शामराव वाघेरे (वय 23, रा. वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रवीण मुळूक यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश याच्याकडे पिस्टल असून ते बेकायदेशीर असल्याची माहिती शस्त्र विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याचा माग काढून कस्पटे वस्ती येथे त्याच्या घरी छापा मारून बुधवारी दुपारी कारवाई केली. त्यात पोलिसांना एक गावढी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस असा 25 हजार 300 रुपयांचा ऐवज आढळला. पोलिसांनी ऋषिकेश याला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.