पिंपरी / चिंचवड

शस्त्र बाळगल्या प्रकरणी एकास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

घातक शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 15) दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास थेरगाव स्मशानभूमीजवळ करण्यात आली.

आकाश उर्फ गणेश गंगाधर मिसाळ (वय 27, रा. जगताप नगर, थेरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष असवले यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेरगाव स्मशानभूमी जवळ दोघेजण हत्यारे घेऊन आले असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन कारवाई केली. आरोपी आकाश याच्याकडे कोयता आणि अल्पवयीन मुलाकडे तलवार अशी हत्यारे पोलिसांनी जप्त केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button