TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या प्लॉगेथॉन मोहिमेत पाऊण लाख पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला सहभाग; 64 हजार किलो कच-याचे संकलन

पिंपरी चिंचवड | विकासाबरोबरच आपले शहर देशातील स्वच्छ आणि सुंदर असावे यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने स्वछाग्रह या मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. रविवारी (दि. 21) सकाळी 7 ते 10 या वेळेत प्लॉगेथॉन मोहिम राबविण्यात आली. शहरातील 32 प्रभागातील 64 ठिकाणी ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये सुमारे 73 हजार 730 नागरिकांनी सहभागी होत 64 हजार 397 किलो प्लॅस्टीकसह इतर कचरा संकलित केला. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्द्ल महापौर ढोरे यांनी सर्वांचे कौतुक केले.या उपक्रमामध्ये शहरातील नामवंत खेळाडू, सिने अभिनेते, कलावंत, साहित्यिक, स्वयंसेवी संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, मंडई असोसिएशन, व्हेंडर असोसिएशन, रिक्षा संघ, गणेश मंडळे, एजी-बीव्हीजी संस्था, ठेकेदार, एजन्सी, गृहनिर्माण संस्था,बचत गट, विद्यार्थी, हॉटेल असोसिएशन, पर्यावरणप्रेमी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

सांगवी येथील पोलीस चौकी पासून महापौर ढोरे यांच्या उपस्थितीत मोहिमेला सुरुवात करण्यात आली. माझी वसुंधरा शपथ घेऊन शहर स्वच्छतेचा संकल्प यावेळी करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहर स्वच्छतेचा मंत्र या विषयावर आधारित नाटिका लहान विद्यार्थ्यांनी सादर केली. महात्मा गांधी, संत गाडगे महाराज यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते.

सांगवी पोलीस चौकी ते साई चौक दरम्यानचा रस्ता तसेच पीडब्ल्यूडी मैदानावरील कचरा यावेळी संकलित करण्यात आला. यावेळी शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसदस्य हर्षल ढोरे, नगरसदस्या शारदा सोनवणे, सीमा चौगुले, सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी विजय थोरात, सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख, प्रशांत जोशी, बाळासाहेब खांडेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओम प्रकाश बहिवाल तसेच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि बाबूराव घोलप महाविद्यालयाचे विद्यार्थी मोहिमेत सहभागी झाले होते.

महापौर ढोरे म्हणाल्या, देशातील सर्वोत्तम शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण करण्याचा ध्यास आपण घेतला आहे. निरंतर शाश्वत विकास साधण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो. शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी प्लॉगेथॉन उपक्रमाला आपण सुरुवात केली आहे. आपण निर्माण केलेला कचरा आपणच स्वच्छ केल्यास शहराचे आरोग्य देखील उत्तम राहण्यास मदत होईल. यासाठी शहरवासीयांची साथ आणि सहभाग महत्वपूर्ण ठरला आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी असे पथदर्शी उपक्रम पूरक आणि लाभदायक ठरत आहेत. नागरिकांनी असेच सहकार्य कायम ठेवून देशातील सर्व क्षेत्रात पिंपरी चिंचवड शहराला अग्रेसर बनवण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन महापौर ढोरे यांनी यावेळी केले.

या मोहिमेमध्ये संकलित केलेल्या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लॅस्टीक कच-यापासून विविध शोभेच्या वस्तू बनविण्यात येणार आहे. त्याचे प्रात्यक्षिक मोहिमेच्या प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आले होते. तसेच कचरा विलगीकरण करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button