breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

‘त्या’ दिवशी मी रुग्णालयाबाहेरच पत्रकारांशी बोललो, भाजपच्या आरोपावर देशमुखांचं स्पष्टीकरण

मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सध्या राजीनाम्याची टांगती तलवार आहे. विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्यासाठी जोरदार मागणी केली आहे. त्यातच, “परमबीर सिंग यांनी उल्लेख केलेल्या दिवसांमध्ये अनिल देशमुख कोरोनामुळे रुग्णालयात होते”, असं म्हणत शरद पवारांनी त्यांची पाठराखण केली. मात्र, यानंतर विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून अनिल देशमुख यांनी १५ फेब्रुवारीला घेतलेल्या पत्रकार परिषदेचे ट्विट रीट्विट करत शरद पवारांनाच उलट सवाल विचारण्यात येत आहेत. त्यावर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खुलासा करणारं स्पष्टीकरण दिलं आहे.

वाचा :-गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार का? जयंत पाटील यांनी दिलं उत्तर, म्हणाले…

काय म्हणाले अनिल देशमुख?

१५ फेब्रुवारीला अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडीओ विरोधकांकडून ट्वीट केले जात असताना अनिल देशमुखांनी ती पत्रकार परिषद रुग्णालयाबाहेरच घेतली असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. “मला कोविड झाल्यामुळे मी ५ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. १५ फेब्रुवारीला माझा डिस्चार्ज झाला. त्यावेळी मी हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना गेटवर काही पत्रकार होते. त्यावेळी माझ्या अंगात त्राण नव्हता. तेव्हा मी हॉस्पिटलमध्येच खुर्चीवर बसलो आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यानंतर मी घरी जाऊन होम क्वारंटाईन झालो. १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत मी होम क्वारंटाईन होतो. २८ फेब्रुवारीला मी पहिल्यांदा बाहेर पडत सह्याद्री गेस्टहाऊसला मीटिंगला गेलो”, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं आहे.

काय आहे आक्षेप?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात फेब्रुवारीच्या मध्यावर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी बोलावून पैसे वसुलीचं टार्गेट दिल्याची माहिती काही पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, या काळात अनिल देशमुख करोनाच्या उपचारांसाठी रुग्णालयात होते, असा खुलासा शरद पवारांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button