breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

ओमिक्रॉनने वाढवलं टेन्शन! नव्या 68 रूग्णांची नोंद, एकूण संख्या 578

मुंबई | प्रतिनिधी  
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 68 नवे रूग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 68 ओमिक्रॉन रूग्ण आढळले आहेत. त्यापैकी 34 रूग्णांचे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने आणि 34 रूग्णांचे अहवाल राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने दिले आहेत.

आज आढळलेले 68 रूग्ण कुठे आहेत?

मुंबई-40

पुणे मनपा-14

नागपूर-4

पुणे ग्रामीण आणि पनवेल-प्रत्येकी 3

कोल्हापूर, नवी मुंबई,रायगड आणि सातारा-प्रत्येकी 1

राज्यात आता ओमिक्रॉन रूग्णांची एकूण संख्या 578 झाली आहे. यातले सर्वाधिक 368 रूग्ण मुंबईत आहेत. 578 पैकी 259 रूग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रूग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

आजपर्यंत 578 रूग्ण आढळले आहेत. ते रूग्ण कुठे कुठे आहेत?

मुंबई- 368

पुणे मनपा-63

पिंपरी चिंचवड-36

पुणे ग्रामीण-26

ठाणे मनपा-13

पनवेल-11

नागपूर-10

नवी मुंबई-9

कल्याण डोंबिवली, सातारा-प्रत्येकी 7

उस्मानाबाद-5

वसई विरार-4

नांदेड-3

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी, मीरा भाईंदर, सांगली, कोल्हापूर-प्रत्येकी 2

लातूर, अहमदगनर, अकोला आणि रायगड-प्रत्येकी 1

एकूण-578

यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई,‍ नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 2375 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 166 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात 12 हजार 160 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे तर 11 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यू दर 2.11 टक्के इतका नोंदवला गेला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 1748 रूग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 65 लाख 14 हजार 358 कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.5 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 93 लाख 70 हजार 95 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 67 लाख 12 हजार 28 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 3 लाख 32 हजार 610 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर 1096 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

मुंबईत दिवसभरात 8082 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात दोन मृत्यू झाले आहेत. दिवसभरात 622 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज घडीला 37 हजार 274 सक्रिय रूग्ण आहेत. तर कोरोनामुळे मुंबईत आत्तापर्यंत 16 हजार 379 मृत्यू झाले आहेत.

आज जे दोन मृत्यू नोंदवले गेले त्यातील एक पुरूष आणि एक महिला आहे. दोघेही 60 वर्षांच्या वरील वयाचे होते तसंच दोन्ही रूग्ण सहव्याधी असलेले होते. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. मुंबईचा रूग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट 93 टक्के इतका झाला आहे. मुंबईचा डबलिंग रेट 138 दिवसांवर गेला आहे. तर मुंबईचा कोव्हिड ग्रोथ रेट 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या आठवड्यात 0.50 टक्के इतका झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button