breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात ओमायक्रॉनचा पहिला बळी; नायजेरियातून आलेल्या व्यक्तीचा मृत्यू

पुणे – नायजेरियातून आलेल्या ५२ वर्षीय ओमायक्रॉनग्रस्त रुग्णाचा पिंपरी-चिंचवड शहरात उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्य झाला आहे. वाय सी एम रुग्णालयातील रुबी अल्केअर केंद्रात उपचार घेत असताना ओमायक्रॉनने ग्रस्त झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या या रुग्णाचा प्राथमिक चाचणीत कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्यावर वाय सी एम रुग्णालयाच्या रुबी अल्केअर केंद्रात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान २८ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा काल अहवाल आल्यानंतर तो ओमायक्रॉनग्रस्त असल्याचे उघड झाले.

ओमायक्रॉनमुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाला १३ वर्षांपासून मधुमेहाच आजार असल्याची माहितीदेखील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत परदेशातून आलेल्या ३२ कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी १४ रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला आहे. तर त्यांच्या निकट सहवासात आलेल्या ११ जणांना ओमायक्रोनचा संसर्ग झाला आहे.

त्याचप्रमाणे राज्यात कालपर्यंत तब्बल १९८ नव्या ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने होत असला तरी या रुग्णांना ऑक्सिजनची किंवा व्हेंटीलेटरची गरज नसल्याचे राज्य साथरोग सर्व्हेक्षण कक्षाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button