breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“मी जे गुण उधळले आहेत त्याचे…”; रश्मी ठाकरे प्रकरणात ओढल्यानंतर अमृता फडणवीसांनी दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

मुंबई |

भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवेसना याविरोधात आक्रमक झाली महाविकास आघाडीतील इतर नेत्यांनीही याबाबत आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. मात्र निषेध व्यक्त करताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही याप्रकरणात ओढलं आहे. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरं झालं. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असतीर तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती, असं विधान विद्या चव्हाण यांनी केले होते. त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.

“महाविकास आघाडीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण म्हणतात की, रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरे झाले. म्हणजे एका प्रकारे त्यांनी भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांची साथ दिली. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. हे मला भाजपवाल्यांना सांगावं वाटतं, असे विद्या चव्हाण म्हणाल्याचे अमृता फडणवीस यांनी टीव्ही९ सोबत बोलताना  सांगितले. “तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने काय काय गुण उधळले त्याचे ट्विट केले तर बरे होईल असेही विद्या चव्हाण म्हणाल्या. जे मी गुण उधळले आहेत त्याचे ट्विट मी केले आहेत. पण त्यामध्ये प्रत्येक प्रकारचे तसेच लोकसेवेचीही गुण होते हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं,” असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

“त्याआधी नवाब मलिक यांना माझा संबंध एका ड्रग्ज तस्कराशी जोडला होता तेव्हा मी याबाबतीत मी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले होते. यावेळी मी माझ्या अंगावर आलात तर सोडणार नाही असे म्हटले होते. त्यावेळीही विद्या चव्हाण यांनी माझ्यावर टीका केली होती. त्यामुळे मी मानहाणीचा खटला दाखल करत आहे. हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रतिभावान स्त्रीचा अपमान आहे आणि तो मी सहन करु शकत नाही,” असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. या विषयी मी त्यांच्यासोबत बोलणार नाही. त्यांनी याबद्दल ट्विटरवर माफी मागावी. त्यांनी असेच बोलणे चालू ठेवले तर मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सिद्धिविनायकचा प्रसाद देणार आहे, असा इशारा अमृता फडणवीस यांनी दिला.

  • भाजपावाल्यांना माझ्या घरात नाक खूपसण्याची सवय- अमृता फडणवीस

“अमृता फडणवीस या देशाच्या नागरिक आहेत. त्यात मी काही करु शकत नाही. माफी मागण्यासारखे मी काही बोलले नाही. त्या मला बोलल्या आहेत. भाजपावाल्यांना माझ्या घरात नाक खूपसण्याची सवय आहे. आमच्या घरात जे काही झाले त्यावर कोर्टात निर्णय लागला आहे. त्यांना डान्सिंग डॉल शब्दावर आक्षेप असेल तर माझ्या घरामध्ये नाक खुपसून मी सुनेला छळले त्या असं कसं म्हणत आहेत. याचा पुरावा त्यांनी द्यावा. हे सर्व लोक समाजात जे चांगले काम करतात त्यांना बदनाम करण्याचे काम करतात. आम्ही फडणवीसांच्या कुटुंबांबद्दल काही बोललले नाही,” अशी प्रतिक्रिया विद्या चव्हाण यांनी दिली आहे

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button