ग्राहकाच्या मुलीसोबत दुकानातच अश्लील चाळे; दुकानदाराला अटक
पिंपरी l प्रतिनिधी
दुकानात आलेल्या एका ग्राहकाच्या अल्पवयीन मुलीसोबत दुकानदाराने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. ही घटना मंगळवारी (दि. 11) दुपारी कामगारनगर, पिंपरी येथे घडली.
जयनील सुरेश शहा (वय 25, रा. स्वप्ननगरी, उद्यमनगर, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलगी तिच्या आई, वडिलांसोबाबत खिडक्यांचे साहित्य घेण्यासाठी मंगळवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास आरोपी जैन याच्या कामगार नगर येथे रुद्रा मेटल या दुकानात गेली होती. घराच्या खिडक्यांचे साहित्य व दरवाजा पहात असताना आरोपी जैन याने अल्पवयीन मुलीच्या खांद्यावर हात ठेवला. फिर्यादी तरुणीने त्याचा हात बाजूला काढून टाकला. आरोपी शहा याने फिर्यादी यांच्या डाव्या हाताला पकडून मागे ओढले. तसेच खांद्यावरील कपड्यांची बाही फाडली. याबाबत पीडित तरुणीच्या आई-वडिलांनी आरोपी शहा याला जाब विचारला. त्यामुळे दुकानदार शहा याने फिर्यादीच्या वडिलांना शिवीगाळ केली. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.