ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

देहू नगरपंचायतीच्या नगररचना व आरक्षण सोडत यावर हरकत

पिंपरी चिंचवड | आगामी देहू नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या नगररचना व आरक्षण सोडत यावर हरकत घेण्यात आली आहे. चव्हाण नगर मधील अनुसूचित जातीच्या ग्रामस्थांनी याबबात हरकत नोंदवत नव्याने प्रभाग रचना करण्याची मागणी केली आहे. मुख्याअधिकारी यांच्याकडे याबाबत हरकत दाखल करण्यात आली आहे.चव्हाण नगर मधील व लगतच्या भागातील दलित समाजाच्या प्रवर्ग निहाय लोकसंख्येच्या अनुरूप आकडेवारी विचारात न घेता प्रभाग क्रमांक 3, 4 व 9 या प्रभागाची रचना चुकीच्या निकषांवर केली आहे. या भागाची भौगोलिक फोड करून त्यांचा सर्वसाधारण प्रभागात समावेश करण्यात आला आहे. दलित वस्तीचा भाग सलग न ठेवता त्याचे विभाजन करण्यात आले असून हे चुकीचे व दलित समाजावर अन्याय करणारे असल्याचे हरकत निवेदनात म्हटले आहे.

दलित समाजाच्या वस्त्यांची भौगोलिक फोड करून विभागणी न करता, अनुसूचित जातीच्या वस्त्यांची अस्तित्वात असलेल्या भौगोलिक भागाप्रमाणे रचना केल्यास दलित समाजाचा विकास होण्यास मदत होईल असे हरकतदारांनी निवेदनात म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button