breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत कोरोनाबाधितांच्या संंख्येत पुन्हा वाढ, आज ७५७ रुग्णांची नोंद

मुंबई | प्रतिनिधी 
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आज तब्बल ७५७ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर, आज फक्त २८० बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

मुंबईतील आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 लाख 70 हजार 190 वर पोहचली आहे. यापैकी 7 लाख 47 हजार 538 जणांनी कोरोनावर मात केलीय. तर, आतापर्यंत 16 हजार 368 जणांचा मृत्यू झालाय. तर, शहरात 3 हजार 703 रुग्णांवर उपचार सुरू आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट आता 97 टक्क्यांपर्यंत आलाय. महत्वाचं म्हणजे, मुंबईतील मृत्यूदर 0.5 टक्यांवर पोहचलाय.

मुंबईत (24 डिसेंबर) शुक्रवारी 683 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले होते. तर, एका जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला होता. शुक्रवारी 267 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. मुंबईत गुरुवारी 602 जणांची कोरोना चाचणी सकारात्मक आली होती. तर एका मृत्युची नोंद करण्यात आली होती. याशिवाय, 207 रुग्ण कोरोनामुक्त झाले होते. मुंंबईत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यानं प्रशासनाचे दाबे दणाणले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून योग्य ती खबरादारी घेतली जातेय.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button