breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

आता महाराष्ट्र पोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची मोठी घोषणा

मुंबई |

करोनाने राज्यात कहर केला असताना मुंबई पोलिसांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे लोकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात असताना मुंबई पोलिसांना मात्र २४ तास कर्तव्यावर हजर राहावं लागत आहे. यामुळेच त्यांना करोनाचा संसर्ग होण्याची भीती जास्त आहे. मुंबईत गेल्या २४ तासात ७१ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. दरम्यान राज्याचा गृहविभागाने पोलिसांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांनाही खासगी कंपनीतील कर्मचाऱ्यांप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येणार आहे. पोलिसांना करोनाची लागण होत असल्याने आता ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’चा आदेश देण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

ते म्हणाले की “आपण ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा आदेश दिला आहे. त्यांनी कर्तव्यावर न येता घरुन काम करायचं आहे”. तसंच पोलिसांसाठी वैद्यकीय व्यवस्था तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राज्यातील निर्बंधांबाबत काही अतिरिक्त माहिती देण्यास नकार दिला. राज्यात आतापर्यंत ९५१० पोलिसांना करोनाची लागण झाली असून १२३ जणांचा मृत्यू झाला आहे.

  • राज्यात २४ तासांत २६,५३८ नव्या करोनाबाधितांची भर…

बुधवारी दिवसभरात तब्बल २६ हजार ५३८ नव्या करोनाबाधितांची भर राज्याच्या एकूण आकड्यामध्ये झाली . त्यामुळे राज्यातल्या अॅक्टिव्ह करोनाबाधिताचा आकडा आता ८७ हजार ५०५ इतका वाढला आहे. त्यासोबतच राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण बाधितांचा आकडा देखील तब्बल ७९७ वर गेल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात दिवसभरात वाढ झालेल्या बाधितांमुळे आजपर्यंत राज्यात आढळलेल्या एकूण बाधितांचा आकडा ६७ लाख ५७ हजार ०३२ इका झाला आहे. त्यापैकी ८७ हजार ५०५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button