breaking-newsटेक -तंत्र

Nokia 5.3 आणि Nokia C3 भारतात लाँच

नवी दिल्ली- HMD Global ने मंगळवारी भारतात आपले चार नवीन हँडसेट लाँच केले आहेत. फिनलँडच्या कंपनीने देशात नोकिया ब्रँड अंतर्गत Nokia 5.3, Nokia C3, Nokia 125 आणि Nokia 150 ला बाजारात उतरवले आहे. नोकिया 5.3 आणि नोकिया C3 स्मार्टफोन आहे. तर नोकिया १५० आणि नोकिया १२५ हे दोन फीचर फोन आहेत. कंपनीचा दावा आहे की, नोकिया सी ३ ला सर्वात आधी भारतात लाँच करण्यात आले आहे.

Nokia 5.3 आणि Nokia C3:ची किंमत
नोकिया ५.३ च्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबीच्या स्टोरेजच्या फोनची किंमत १५ हजार ४९९ रुपये आहे. नोकियाचा हा हँडसेट स्यान, सँड आणि चारकोल कलरमध्ये येतो. याची विक्री १ सप्टेंबरपासून देशात सुरू करण्यात येणार आहे. फोनसाठी आजपासून प्री बुकिंग करता येवू शकते.

नोकिया सी३ च्या २ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. नोकिया सी३ नॉर्डिक ब्लू आणि सँड कलरमध्ये येतो. याची विक्री १७ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. फोनची प्री बुकिंग १ सप्टेंबर पासून सुरू होमार आहे.

Nokia 5.3: चे वैशिष्ट्ये
नोकियाच्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस (1600×720 पिक्सल) स्क्रीन आहे. स्क्रीनवर वॉटरड्रॉप नॉच आहे. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ प्रोसेसर दिला आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी तसेच इनबिल्ट ६४ जीबी स्टोरेज हे पर्याय आहेत. नोकिया५.३ स्टॉक अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या फोनमध्ये कंपनी दोन वर्षासाठी अँड्रॉयड अपग्रेड्स आणि ३ ग्लास साठी सिक्योरिटी अपडेट्स देते. हँडसेटला पॉवर देण्यासाठी 4000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, २ मेगापिक्सलचा मायक्रो आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. रियर कॅमेरा नाइट मोड, पोर्ट्रेट मोड आदी सपोर्ट करते.

Nokia C3:चे वैशिष्ट्ये
मेड इन इंडिया स्मार्टफोन म्हणून नोकिया सी३ चा प्रचार केला जात आहे. नोकिया सी ३ मध्ये ५.९९ इंचाचा एचडी प्लस स्क्रीन आहे. फोनमध्ये Unisoc sc9863a प्रोसेसर दिला आहे. २ जीबी आणि ३ जीबी रॅम पर्याय आहे. फोनमध्ये १६ जीबी व ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय दिला आहे.

नोकिया सी३ मध्ये ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 3040mAh रिमूवेबल बॅटरी दिली आहे. फोन २जी नेटवर्कवरर ५० तास, ३ जी नेटवर्कवर २३ तासांपर्यंत टॉक टाईम आणि २ जीवर २२ तासांपर्यंत टॉकटाईम मिळतो, असा कंपनीचा दावा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button