breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ओमोयक्रॉनच्या संकटामुळे एपीएमसीत ‘नो मास्क, नो एंट्री’

नवी मुंबई |प्रतिनिधी 
कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी ‘नो मास्क-नो एंट्री’ची राबविण्यात आलेली मोहीम, आता कोरोननांतर आलेले ओमिक्रॉनचे संकट पहाता पुन्हा एकदा ‘नो मास्क-नो एंट्री’ सक्तीचे करण्यात आले आहे.अतिशय गर्दी असलेल्या ठिकाणी हे नियम बंधनकारक करण्यात आले असून, याच पार्श्वभूमीवर वाशी एपीएमसीमध्ये सर्वांना मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, ओमायक्रॉनच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर वाशी एपीएमसीमध्ये सर्वांना मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क न घालणाऱ्या कामगार, व्यापारी आणि ग्राहक यांना एपीएमसीमध्ये प्रवेश मिळणार नाही. ट्रक ड्रायव्हर, माथाडी कामगार, व्यापारी तसेच ग्राहकांचं पूर्ण लसीकरण झालेलं नसल्यास त्यांना तात्काळ लस देण्याची व्यवस्था एपीएमसीमध्ये करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजी आणि फळ मार्केटमध्ये टप्प्याटप्प्यानं शेतमाल आणावा असे आवाहन एपीएमसी प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. मंडळ कार्यालयांमध्ये ‘नो मास्क-नो एंट्री’च्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. करेनाच्या बचावासाठी चालवलेली मोहीम लक्षात घेऊन पुन्हा एकदा नो-मास्क नो-एंट्रीच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button