breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

सरकारी कार्यालयात पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय आता प्रवेश नाही, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे |प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सरकारी आणि खाजगी कार्यालयासाठी सुद्धा प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. असं असलं तरी आता सरकारी कार्यालयांमध्ये पूर्वपरवानगीशिवाय जाण्यास नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

परवानगी घेऊन सरकारी कामांसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाच्या प्रमुखावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे इथून पुढे महत्त्वाच्या कामांसाठी सरकारी कार्यालयात जाण्यापूर्वी किंवा संबंधित कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी किंवा पूर्व परवानगी घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. नागरिकांना पूर्वपरवानगीशिवाय सरकारी कार्यालयात जाण्यास बंदी घालण्यात आली असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

शहरातील हॉटेल, दुकाने, मॉल तसेच ई-कॉमर्स सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लसीचे दोन डोस घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. या ठिकाणी लसीकरण न झालेले कर्मचारी आढळून आल्यास संबंधित दुकाने हॉटेल किंवा कार्यालय सील केले जाणार आहे. रॅपिड डिझेल टेस्ट करण्याचा ही सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर देशमुख यांनी दिले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button