TOP Newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

दिवसभरात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही, नवीन 34 रुग्णांची नोंद

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असून मृत्यूदरही कमी झाला आहे. शहराच्या विविध भागातील 34 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नाही. ही दिलासादायक बाब मानली जात आहे.

आजपर्यंत शहरातील 4 हजार 519 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 78 हजार 186 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 375 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 163 रुग्ण गृहविलगीकरणात असून 212 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 24 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 254 आहेत. आज दिवसभरात 8 हजार 66 नागरिकांचे लसीकरण झाले असून आजपर्यंत 28 लाख 71 हजार 348 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button