breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीविदर्भ

नागपुरात मागील 24 तासांत कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

नागपूर – महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर काही शहरांमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोकादेखील वाढताना दिसत आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्यात येत आहेत. अशातच नागपूरकरांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नागपुरात गेल्या 24 तासांत शून्य कोरोनाबळींची नोंद झाली आहे. कालच्या दिवसात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. विशेष म्हणजे या महिन्यात तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली असल्याने नागपूरकरांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

नागपूर शहरात गेल्या 24 तासांत केवळ 22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून दिवसभरात 69 जणांनी कोरोनावर मात केली आहे. यासह कोरोनामुक्त होण्याचा दर 98.2 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर नागपुरातील कोरोनाची सक्रिय रुग्ण संख्याही 426 वर आली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button