breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

कामावर आल्यास कारवाई नाही! ; संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना राज्यसरकारची ग्वाही, तोडग्यासाठी पवारांचा पुढाकार

मुंबई |

एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर केल्यानंतरही दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह एसटी संघटनांच्या नेत्यांची बैठक घेतली़ कामावर हजर झाल्यास कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी ग्वाही परब यांनी दिली, तर किती ताणायचे याचा तारतम्याने विचार करण्याची गरज असून, एसटी सेवा पूर्वपदावर आणण्याचे आवाहन पवार यांनी केल़े ही चर्चा सकारात्मक झाल्याने एसटी संपाबाबत तोडगा निघण्याचे संकेत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार यांनी सोमवारी राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह २२ कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसह सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेतली.

एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण व्हावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून संप पुकारला आहे. विलिनीकरणाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एसटी कामगारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता देण्यात आल्यानंतरही केवळ विलिनीकरणासाठी संप सुरु ठेवण्यात आला आहे. राज्यभरात एसटी बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. आतापर्यंत ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही, अशा सुमारे ५० हजार कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू झाल्यास त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. त्याचबरोबर बडतर्फ, निलंबित आणि सेवासमाप्ती यासारख्या कारवाई झालेल्या संपकरी कर्मचाऱ्यांच्याबाबतीत वाहतूक सुरळीत सुरु झाल्यानंतर सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.  विलनीकरणासंदर्भात तयार करण्यात आलेली समिती १२ आठवडय़ांत आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालाचे पालन कर्मचारी आणि राज्य शासनावर बंधनकारक असणार आहे. कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात पगारवाढ देण्यात आली आहे. पगारवाढीमध्ये काही तफावत झाली आहे. त्याबाबत कृती समितीसोबत चर्चा करण्यात आली आहे. कृती समितीने सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी अशी मागणी करुन आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीचा अभ्यास करुन निर्णय एसटी सुरु झाल्यानंतर देण्यात येईल, असेही अनिल परब यांनी स्पष्ट केले. गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.

एसटी संपामुळे राज्यभरातील प्रवाशांना प्रचंड त्रास होत आह़े त्यातच पुन्हा करोना संकट उभे ठाकल्याने राज्यातील अर्थकारणावर होतोय. त्यामुळे राज्यातील राज्य सरकारला त्याची मोठी आर्थिक किंमत द्यावी लागत आहे. कृती समितीच्या सदस्यांचे काही प्रश्न आहेत, त्यातील काही प्रश्नांकडे कृती समितीने सरकारचे लक्ष वेधले आहे. या प्रकरणी सकारात्मक निर्णय घेण्याचे सरकारचे प्रयत्न असतील, असे राज्य सरकारने सांगितले. त्यानंतर आता एसटी सेवा सुरू झाली पाहिजे, कर्मचाऱ्यांनी कामावर यायला पाहिजे, असे आवाहन शरद पवार यांनी केले. तुमच्या इतर प्रश्नांवरही सरकार सकारात्मक दृष्टीकोन ठेवून विचार करेल, अशी ग्वाही पवारांनी एसटी कर्मचारी नेत्यांना दिली. गेल्या ७० वर्षांपेक्षा अधिककाळ सर्वसामान्यांची एसटी कष्टकरी एसटी कामगारांच्या प्रामाणिक प्रयत्नांवर व प्रवाशांच्या विश्वासार्हतेवर टिकून आहे. एसटी ही प्रवाशांच्या हितासाठी आहे. प्रवाशांच्या हिताची जोपासना करणे ही आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. त्याला एसटी देखील अपवाद नाही. तरीदेखील एसटीच्या कर्मचाऱ्यांना ४१ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात आलेली आहे. हा निर्णय अंत्यत धाडसी असून त्याबद्दल पवार यांनी एसटी प्रशासन आणि शासनाचे कौतुक केले. तथापि, कृती समितीने सुधारीत वेतनवाढीतील तफावतीबाबत नोंदविलेल्या आक्षेपावर एसटी प्रशासन आणि राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे शरद पवार यांनी नमूद केले.

  • ‘सदावर्ते यांच्यामुळे चूल बंद’

’वकील गुणरत्न सदावर्तेच्या आक्रस्ताळेपणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या घराची चूल बंद होण्याची वेळ आली आहे. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मनात विलीनीकरणाबाबत संभ्रम निर्माण केला आहे.  ’एसटी कर्मचारी नैराश्यात असल्याचे सदावर्ते म्हणत असले तरी प्रत्यक्षात गुणरत्न सदावर्ते हेच नैराश्यात आहेत. लोकांची माथी भडकवण्याचे उद्योग ते करत आहेत, अशी टीका एसटी कर्मचारी संघटनेचे सुनील निरभवणे यांनी केली.

’दोन महिने सुरू असलेल्या संपामुळे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. बैठकीमध्ये शरद पवार आणि अनिल परब यांनी पगारवाढीमधील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कामगारांनी आपली एसटी टिकवण्याचा विचार केला पाहिजे, असे आवाहनही निरभवणे यांनी केले.

किती ताणायचे, याचे तारतम्य कर्मचाऱ्यांनी बाळगणे गरजेचे आह़े  एसटी कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सरकार सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विचार करेल़ पण, कर्मचाऱ्यांनी एसटी पूर्वपदावर आणावी…  -शरद पवार, ज्येष्ठ नेते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button