पुण्यातील पायाभूत सुविधा विकास कंपनी SDPL-UHPC INDA LLP ने हे तंत्रज्ञान भारतात आणले आहे. कंपनीने किवळे, पुणे येथे ही भारतातील पहिली UHPC उत्पादन सुविधा स्वदेशी विकसित केली आहे. भारतातील पहिला दीर्घ कालावधीचा UHPFRC पूल SDPL-UHPC INDIA कंपनीने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे आणि सध्या या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे इतर विविध प्रकल्प कार्यान्वित आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे अधिक टिकाऊ संरचना, जलद बांधकामे आणि किफायतशीर उपायांसह प्रभावी पायाभूत सुविधा विकासाच्या भारत सरकारच्या ध्येय आणि दृष्टीला चालना मिळेल.