Uncategorized

“कोणाचे कसे बारा वाजवायचे हे मला चांगलचं माहित आहे” नाव न घेता निलेश लंकेची जोरदार टीका

पारनेर: राज्य शासनाच्या हमीतून आणि एशियन डेव्हलपमेंटच्या बँकेच्या निधीतून धोत्रे येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे माजी मदार विजय औटी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते . औटी यावेळी म्हणाले होते की की मला असे वाटत नाही की या कामामध्ये कोणी खोडा घालावा. विकासासाठी तुम्ही निवडून आला असाल तर या गावामध्ये नको, त्या गावामध्ये रस्ता करा, या गावात मते कमी पडली त्यामुळे तेथे काम नको ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. तसेच मी सर्वांचा बाप आहे अशी दर्पोवक्ती देखील त्यांनी केली होती.

 

कोणाचे कसे बारा वाजवायचे हे मला निश्तित माहित आहे. हंगा म्हणजे स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईकांची जन्मभूमी आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची गावांमध्ये गरज आहे. मोठ्या मोठ्या गावांमध्ये चौकाचौकात अशी शिवस्मारक उभारणार असल्याचे आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची समाजाला गरज असून या समाज व्यवस्थेला देखजील महाराजांच्या विचारांची गरज आहे. त्यामुळे हंगा या गावात ही वास्तू उभारल्यानंतर पारनेर तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गावात अश्वारूढ पुतळा उभा करण्याचा मानस आमदार निलेश लंके यांनी बोलून दाखवला आहे.

 

जातेगाव, पुणेवाडी व राळेगण सिद्धी नंतर पठार भागातील पाण्यासाठी कान्हूर पठार पाणी योजना राबविण्यात येणार असल्याचे आमदार लंके यांनी म्हटले आहे. यावेळी विरोधकांचा समाचार घ्यायला देखील लंके विसरले नाही. सर्वप्रथम माजी आमदारांनी हे लक्षात घ्यायला हवे की पदांमुळे माणसाला ओळख मिळत नाही तर माणसामुळे त्या पदांची ओळख झाली पाहिजे असे काम प्रतिनिधींकडून झाले पहिजे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या पदाला साजेसे काम करून सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा असेही आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button