breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

तामिळनाडूमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू, रविवारी असणार संपूर्ण लॉकडाऊन

चेन्नई | टीम ऑनलाइन
कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्यात येत असून, तामिळानाडू सरकारने राज्यात गुरुवारपासून रात्रीचा कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. यानुसार रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असणार आहे. याशिवाय रविवारी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, सर्व सार्वजनिक आणि खाजगी पोंगल सांस्कृतिक उत्सव पुढे ढकलण्यात आले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, 6 जानेवारीपासून रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याशिवाय रविवारी 9 जानेवारी रोजी संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून, रेस्टॉरंट्सना सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत टेकवे चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. बस, ट्रेन आणि मेट्रोमध्ये फक्त 50 टक्के वहिवाटीला परवानगी असेल.  सर्व मनोरंजन आणि करमणूक उद्याने बंद राहतील. याशिवाय इयत्ता 1 ते 9 वीच्या  वर्गांसाठी फक्त ऑनलाइन वर्गांना परवानगी देण्यात आली आहे. तर 10वी ते 12वीचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू राहणार आहे. रविवारी संपूर्ण लॉकडाऊन दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता सर्व बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या काळात आपत्कालीन सेवा वगळता सर्व बाजार आणि कार्यालये बंद राहणार आहे.

मंगळवारी तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 2,731 नवीन रुग्ण आढळून आले होते. तर 9 जणांचा मृत्यू झाला होता. तामिळानाडूमध्ये कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 27 लाख 55 हजार 587 झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या 12 हजार 412 झाली आहे. राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनचे 121 रुग्ण आढळले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button