ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#NigdiNews : अल्पवयीन मुलीवर बलात्कार, तरुणाला अटक 

पिंपरी चिंचवड

 जेवण करण्याच्या बहाण्याने लॉजवर घेऊन जात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अजंठानगर, चिंचवड येथील लॉजवर गुरुवारी (दि.24) दुपारी अडीच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. 

युवराज साळुंखे (वय 22, रा. म. फुले नगर, चिंचवड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडीत अल्पवयीन मुलीने शनिवारी (दि.26) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी विरोधात भारतीय दंड विधान कलम 376, 506, बाल लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 कलम 3, 4, 7, 8 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी मुलीला जेवण करण्याच्या बहाण्याने जबरदस्तीने टेम्पोत बसवून लॉजवरती घेऊन गेला. मला तू खूप आवडतेस असे म्हणून फिर्यादी यांच्या सोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले. आई बाबांना सांगितले तर तुला बघुन घेतो अशी धमकी दिली. आरोपीला अटक केली असून, चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button