breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

न्यूझीलंडच्या एजाझचा मोठा विक्रम; भारताचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला

मुंबई – न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलने वानखेडे मैदानावर मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. भारताविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात एजाझने एका डावात 10 बळी घेत दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या पंगतीत स्थान मिळवले आहे. एका डावात 10 बळी घेणारा एजाझ कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. भारताच्या मोहम्मद सिराजच्या रूपात एजाझने 10 वा बळी घेतला आणि वानखेडे मैदानावर त्याच्या नावाचा जयघोष सुरू झाला होता.

एजाझ पटेलने 47.5 षटकात 119 धावांत भारताचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला. कुंबळे आणि एजाझव्यतिरिक्त इंग्लंडच्या जिम लेकर यांनी हा विक्रम पहिल्यांदा रचला होता. कसोटीच्या एका डावात 10 बळी घेण्याचा पराक्रम फिरकी गोलंदाजांनीच केला आहे. पण पहिल्यांदाच एखाद्या गोलंदाजाने घराबाहेर हा पराक्रम केला आहे. याआधी कुंबळे आणि लेकर यांनी घरच्या मैदानावर ही कामगिरी केली होती. 1956 मध्ये इंग्लंडच्या लेकर यांनी (51.2-23-53-10) ओल्ड ट्रेफर्डवर ऑस्टेलियाविरुद्ध आणि 1999 मध्ये कुंबळेने (26.3-9-74-10) पाकिस्तानविरुद्ध 10 बळी घेतले होते. एजाझने 10 बळी परदेशात मिळवण्याची किमया साधली आहे.

न्यूझीलंडकडून आतापर्यंत रिचर्ड हेडलीने सर्वाधिक 9 बळी घेतले होते. हा विक्रमसुद्धा त्याने मोडीत काढला. विशेष म्हणजे एजाझ हा जन्माने मुंबईकर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button