TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

न्यू इयर गिफ्ट! व्यावसायिक गॅस सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त!

पिंपरी चिंचवड | इंडियन ऑइलने व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये 100 रुपयांनी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडियन ऑइल नवीन वर्षात लोकांना मोठी भेट दिली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सध्याचे व्यावसायिक दर पाहता हॉटेलिंग बिलाचा आकार जास्त होता. पण आता इंडियन ऑईलच्या या निर्णायामुळे हॉटेल चालकांच्या खिशाला बसणारी झळ कमी झाली आहे.

याआधी डिसेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यातील एलपीजी सिलेंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी करण्यात आली. परंतु यावेळी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. ही जनतेसाठी दिलासादायक बाब आहे. व्यवसायिक सिलेंडरच्या दरात कपात झाल्याने रेस्टॉरंट मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 100 रुपयांच्या किंमत कपातीनंतर दिल्लीत 19 किलोच्या व्यवसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 2,001 रुपये झाली आहे.

तुमच्या शहरातील सिलिंडरची किंमत जाणून घ्या

तुम्हाला तुमच्या शहरातील गॅस सिलिंडरच्या (LPG Cylinder) नवीन किमती जाणून घ्यायच्या असतील, तर तुम्ही सरकारी तेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ते पाहू शकता. यासाठी तुम्ही IOCL वेबसाइटवर जा (cx.indianoil.in/webcenter/portal/Customer/pages_productprice). यानंतर, वेबसाइटवर राज्य, जिल्हा आणि वितरक निवडा आणि नंतर शोध पर्यायावर क्लिक करा. यानंतर गॅस सिलिंडरच्या किमती तुमच्या समोर येतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button