breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत नव्याने विभागप्रमुख घोषित

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध विभागांच्या कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सद्यस्थितीत कोणत्या विभागप्रमुखांकडे कोणकोणत्या विभागाची कामे सोपविण्यात आली आहेत. याबाबत एकत्रित आदेश नाहीत. त्यासाठी आता नव्याने विविध विभागांचे विभागप्रमुख घोषित करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र महापालिका अधिनियमानुसार अंमलबजावणी करण्याची कामे महापालिकेतील विविध अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहेत. अंमलबजावणी करण्याच्या प्रयोजनासाठी असलेला संपूर्ण कार्यकारी अधिकार आयुक्तांकडे असतो. या अधिनियमानुसार महापालिकेतील विविध विभागांच्या कामकाजासाठी विभागप्रमुख घोषित करण्यात आले आहेत. काही विभागांच्या कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सद्यस्थितीत कोणत्या विभागप्रमुखांकडे कोणकोणत्या विभागाची कामे सोपविण्यात आली आहेत. याबाबत एकत्रित आदेश नाहीत. त्यानुसार आता नव्याने विविध विभागाचे विभागप्रमुख घोषित करण्यात आले आहेत.

महापालिकेचे विभाग आणि त्या विभागाचे प्रमुख म्हणून घोषित केलेली संवर्गनिहाय पदे – प्रशासन विभाग (उपायुक्त), माहिती आणि जनसंपर्क विभाग (उपायुक्त), स्थानिक संस्था कर (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त), अग्निशमन विभाग (मुख्य अग्निशमन अधिकारी), आपत्ती व्यवस्थापन (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त सुरक्षा विभाग (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त), मध्यवर्ती भांडार विभाग (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त), निवडणूक आणि जनगणना (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त), स्थापत्य (शहर अभियंता) स्थापत्य प्रकल्प (सहशहर अभियंता)

बीएसयूपी आणि इडब्लूएस प्रकल्प (सहशहर अभियंता) बीआरटीएस प्रकल्प आणि वाहतूक नियोजन (सहशहर अभियंता), बांधकाम परवानगी आणि अवैध बांधकाम किंवा अतिक्रमण नियंत्रण आणि निर्मूलन विभाग (सहशहर अभियंता), अतिक्रमण मुख्य कार्यालय (सहशहर अभियंता), झोपडपट्टी निर्मूलन स्थापत्य (सहराहर अभियंता), वैद्यकीय विभाग (सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी), यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (पदव्युत्तर पदवी संस्था अधिष्ठाता), माहिती आणि तंत्रज्ञान विभाग (मुख्य माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी), पशुवैद्यकीय अधिकारी (सहायक आयुक्त), विद्युत मुख्य कार्यालय (सहशहर अभियंता विद्युत), कार्यशाळा (सहशहर अभियंता), अणुविद्युत आणि दूरसंचार विभाग (कार्यकारी अभियंता, दूरसंचार), पाणीपुरवठा, सेक्टर क्रमांक २३ (सहशहर अभियंता किंवा कार्यकारी अभियंता), जलनिस्सारण (सहशहर अभियंता), पर्यावरण अभियांत्रिकी विभाग (सहशहर अभियंता, पर्यावरण) नगररचना आणि विकास योजना (उपसंचालक), लेखापरीक्षण विभाग (मुख्य लेखापरीक्षक),

करसंकलन, आकारणी विभाग आणि अभिलेख कक्ष (उपायुक्त), नागरवस्ती आणि विकास योजना (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त), भूमी आणि जिंदगी (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त), आकाशचिन्ह आणि परवाना (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त), क्रीडा विभाग (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त), कामगार कल्याण विभाग (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त) झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभाग (सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी), आरोग्य विभाग (उपायुक्त किंवा आरोग्य वैद्यकीय अधिकारी), सभाशाखा (नगरसचिव), उद्यान आणि वृक्षसंवर्धन विभाग (मुख्य उद्यान अधीक्षक किंवा उपायुक्त), शिक्षण विभाग (प्राथमिक) (उपायुक्त किंवा सहायक आयुक्त), कायदा विभाग ( कायदा सल्लागार), माध्यमिक शिक्षण उपायुक्त किंवा सहायक आयुक्त), आय.टी.आय. मोरवाडी आणि कासारवाडी (प्राचार्य), नागरी सुविधा केंद्र आणि आधारकार्ड योजना (माहिती आणि तंत्रज्ञान अधिकारी),

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button