breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडीराष्ट्रिय

व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक अचानक बंद पडल्याने नेटकरी हैराण

नवी दिल्ली – आजकाल नेटकऱ्यांच्या रोजच्या सवयीचे झालेले व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक काल रात्री ९.३० वाजताच्या सुमारास जगभरातील अनेक ठिकाणी अचानक ठप्प झाले आणि चांगलीच खळबळ उडाली. जगभरातल्या तब्बल 10.6 दशलक्ष लोकांनी या काळात आपल्याला सेवा वापरता येत नसल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर तब्बल ७ तासांहून अधिक काळानंतर आज पहाटे फेसबुकच्या मालकीच्या या तीनही सेवा पूर्णपणे सुरळीत झाल्या. फेसबुकने या प्रकारानंतर युजर्सची माफी मागितली असून आभारही मानले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक जगभरात बंद पडल्याने कोट्यवधी युजर्सना याचा मोठा फटका बसला. अनेकांनी ट्विटरवरून आपल्याला येणाऱ्या अडचणी मांडल्या. तर ट्विटरनेही ‘अगदी सर्वांना नमस्कार’ असे म्हणत युजर्सचे स्वागत केले. फेसबुकच्या या डाऊनमुळे कंपनीला आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. शेअर्समध्ये एका दिवसात ४.९ टक्क्यांची घसरण झाली. नोव्हेंबरपासून एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण होती. यामध्ये फेसबुकला जवळपास ५ लाख ४५ हजार डॉलर प्रत्येक तासाला नुकसान झाले आहे. फेसबुकचे माजी सिक्युरिटी ऑफिसर अ‍ॅलेक्स स्टॅमोस यांनी म्हटले की, ‘सर्व्हरवर लोड आल्याने किंवा चुकीचा कोड नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टिममध्ये पुश झाल्याने असे झाल्याची शक्यता आहे.’

दरम्यान, २०१९ मध्ये फेसबुकला अशाच प्रकारच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी फेसबुक आणि त्यांच्या मालकीचे इतर अ‍ॅप्स जवळपास 14 तास बंद पडले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button