breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवस राज्यव्यापी आंदोलन

मुंबई – सातत्याने होणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्य जनता हैराण असतानाच काल जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅसच्या किंमतीतही वाढ झाली. या महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून आज आणि उद्या राज्यभर आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तुमचं सिलेंडर आमच्या घराच्या सुखसमृद्धीत आणि शांतीत आग लावत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन छेडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराच जयंत पाटील यांनी यावेळी दिला आहे.

‘जगावं की मरावं’ असा प्रश्न हॅम्लेटच्या नाटकात विचारला होता. मोदींच्या केंद्र सरकारमुळे वाढलेल्या महागाईने, इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे व गृहिणींचे बजेट कोलमडून पडले आहे. जगावं की मरावं या प्रश्नाचे उत्तर ‘मन की बात’मध्ये दिसते त्यावेळी ते ‘मरावंच’ असं दिसत असल्याचा टोला जयंत पाटील यांनी लगावला. ते म्हणाले, ‘सामान्य जनतेचा आक्रोश केंद्र आणि राज्य सरकारसमोर मांडला पाहिजे.’ त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यात आंदोलन करण्याचे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

‘गृहिणींच्या बजेटमध्ये फार मोठं संकट केंद्र सरकारने निर्माण केले आहे. अचानकपणे सिलेंडरचे दर 25 रुपयांनी वाढवले. 20 दिवसाला 809 रुपये तर महिन्याला दीड हजार रुपये सिलेंडरमागे सर्वसामान्य जनतेला द्यावे लागणार आहेत. याचा निषेध करताना जयंत पाटील यांनी आज आणि उद्या राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button