breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार सातारा जिल्हा दाैऱ्यावर ; पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद

सातारा | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे येत्या 27 डिसेंबरला सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून ते शासकीय विश्रामगृहावर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत,अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.

शरद पवार यांचे सोमवारी सकाळी 10.30 वाजता सैनिक स्कूल सातारा येथे हेलिकॉप्टरने दाखल होणार आहे. पवार यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता रयतशिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात रामशेठ ठाकूर भवन या इमारतीचा व नूतनीकरण केलेल्या प्रशासकीय कार्यालयाचा शुभारंभ होणार आहे या समारंभाला संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, व्हा. चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, गृहमंत्री ना. दिलीप वळसे-पाटील, संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर व सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमानंतर शरद पवार शासकीय विश्रामगृहात ते पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर दुपारी कोरेगाव तालुक्यातील करंजखोप येथे पवार हे जाणार आहेत. सोळशी येथे मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर यांच्या निवासस्थानी भेट देणार आहे,असेही पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button