breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारणलेख

राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार पुन्हा ‘ऑन फिल्ड’

भोसरीत साने कुटुंबियांची घेतली भेट  : सामाजिक उपक्रमांच्या निमित्ताने सक्रीय

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते पार्थ पवार पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा ‘ऑन फिल्ड’ पहायला मिळाले. महाविकास आघाडी सत्तेच्या काळात शहरातील सक्रीय राजकारणापासून बाजुला राहिलेले पार्थ आगामी महापालिका निवडणुकांत निर्णायक भूमिकेत राहण्याची शक्यता आहे.

मावळ लोकसभा मतदार संघातून पार्थ पवार यांनी २०१९ मध्ये निवडणूक लढवली. नवख्या असलेल्या पार्थ यांनी आव्हानात्मक परिस्थितीत म्हणजे तत्कालीन शिवसेना- भाजपा महायुतीच्या विद्यमान उमेदवाराविरोधात दोन हात केले. या निवडणुकीत पार्थ यांना पराभवाचा सामना करावा लागला.

दरम्यान, पार्थ यांनी महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात सुरूवातील काही मुद्यांवर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात जातीने लक्ष घातले होते. मात्र, मध्यंतरी स्थानिक नेत्यांनी पार्थ यांचा हस्तक्षेप कमी व्हावा. याकरिता तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केल्याचे बोलले जाते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात पार्थ यांनी पिंपरी-चिंचवडच्या स्थानिक राजकारणापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. मात्र, महाविकास आघाडी सरकार राज्यातून पाय उतार झाल्यानंतर लगेचच पार्थ यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांच्या जयंती निमित्त दत्ता काका साने प्रतिष्ठान व वीर अभिमन्यू फ्रेंड सर्कल यांच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या निमित्त पार्थ यांनी चिखलीत भेट दिली. दत्ताकाकांच्या निधनानंतर पार्थ यांनी साने कुटुंबियांची दोन-तीनदा भेट घेतली आहे. तसेच, यश साने यांना विद्यार्थी आघाडीच्या शहराध्यक्षपदी संधी देण्यात आली असून, त्यांना राजकीय ताकद देण्याचीही भूमिका पार्थ यांनी घेतलेली पहायला मिळते.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची अनुपस्थिती…

पिंपरी-चिंचवड शहरात युवा नेते पार्थ पवार यांनी भेट दिली. तसेच, राज्यभरात प्रसिद्ध असलेले आमदार निलेश लंके यांनीही साने कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट यांच्या मोजके पदाधिकारी  उपस्थित होते. मात्र, विद्यमान शहराध्यक्ष अजित गव्हाणे या कार्यक्रमात दिसले नाहीत. यापूर्वी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या ‘‘निर्धार विजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’’ या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार आले होते. त्यावेळी शहरातील मातब्बर नेते आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल आदी कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. राज्यस्तरावरील नेते आल्यानंतर शहरातील बडे नेतेच कार्यक्रमाकडे पाठ फिरवत असतील, तर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नकारात्मक संदेश जात आहे, याचा विचार स्थानिक नेत्यांनी केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

काकांच्या जयंतीनिमित्त पार्थदादा पवार यांनी उपस्थित राहत काकांच्या स्मृतींना उजाळा दिला. स्व.काकांवर पवार परिवाराचे कायमच विशेष प्रेम राहिले आहे. आदरणीय पवारसाहेब, अजितदादा, सुप्रियाताई ह्यांनी कायमच काकांना पाठबळ तर दिलेच, पण काका आज आपल्यात नसतानाही पवार कुटुंबियांचे प्रेम,पाठबळ व मार्गदर्शन आजही मला लाभत आहे. त्याबद्दल मी कायमच ऋणी राहील.

  • यश साने, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, पिंपरी-चिंचवड.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button