breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळर यांची ‘हॅट्रिक’ : विधान परिषद निवडणुकीत दणदणीत विजय

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू सहकारी, राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. विधान परिषद निवडणुकीत त्यांनी पहिल्या क्रमाकांची २८ मतं घेऊन दणदणीत विजय मिळविला आहे. त्यामुळे रामराजे पुन्हा एकदा हेडमास्तरांच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांच्या विजयामुळे सभापतीपद त्यांच्याकडेच राहणार आहे.

आपले दोन उमेदवार निवडून येण्यासाठी राष्ट्रवादीचे आवश्यक संख्याबळ होतं. त्यानुसार राष्ट्रवादीने त्यांच्या मतांचा कोटा ठरविला होता. त्यानुसार रामराजेंना पहिल्या पसंतीची २८ मतं मिळाली. तर एकनाथ खडसे यांना २९ मतं मिळाली. शिवसेनेचेही सचिन अहिर २६ आणि आमश्या पाडवी यांना २६ मतं मिळाली. तर भाजपचे चार उमेदवार विजयी झाले. राम शिंदे, प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय हे विजयी झाले आहेत.
रामराजे निंबाळकरांची हॅट्रिक
रामराजे निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील फलटणच्या राजघराण्याचे २९ वे वंशज आहेत. रामराजे निंबाळकर 1991 मध्ये फलटण पालिकेचे नगराध्यक्ष झाले. 1995 मध्ये सर्वप्रथम ते फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. राज्यातील अपक्ष 22 आमदारांची मोट बांधून त्यांनी शिवसेना नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता.

मनोहर जोशी आणि रामराजे निंबाळकर यांनी त्याच सुमारास फलटणमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. त्यामध्ये रामराजेंना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्षपद देण्यात आले. शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी रामराजे राष्ट्रवादीसोबत गेले होते. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी असताना रामराजेंना महसूल राज्यमंत्रिपद देण्यात आले. 2004 मध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाची धुराही देण्यात आली होती. 2013 मध्ये रामराजेंना राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष करण्यात आले.

दरम्यान, शरद पवार यांनी २०१० मध्ये रामराजेंना विधान परिषदेवर संधी दिली. पुन्हा २०१६ साली रामराजे विधान परिषदेवर गेले. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत. आता रामराजेंनी तिसऱ्यांदा विधान परिषदेत विजय मिळविला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button