breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहिला दिनराजकारण

राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसतर्फे ‘त्या’ रणरागिनींचा मायेची साडी देऊन सन्मान

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवती सेलतर्फे सिग्नलवर वगैरे थांबून आपल्या मुलांचा सांभाळ करतात अशा रणरागिनिंचा मायेची साडी देऊन सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवती काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा यांच्या वतीने महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.

यामध्ये विशेषतः पिंपरी-चिंचवड शहरातील जे वंचित आणि दुर्बल घटक आहेत, अशा महिला जे सिग्नलवर वगैरे थांबून अशा कोरोनाच्या परिस्थितीतही आपल्या मुलांचा सांभाळ करुन त्या रात्रंदिवस संघर्ष करतात आणि खरतर या रनरागिनी आहेत म्हणूनच ह्या महिलांचा सन्मान होणे गरजेचे वाटले. व यातूनच या आमच्या माता भगिनींना मायेची साडी देऊन तसेच त्यांना व त्यांच्या मुलांना खाद्यपदार्थ व मास्क वाटप करून आज महिला दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, शलाका बनकर, लालबी शैख लोखंडे, सुप्रिया काटे साळवी, नयन पाटील आदी उपस्थित होत्या.

वाचा- सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरांमध्ये बेंगलोर प्रथम; पुणे ठरले दुसऱ्या क्रमांकाचे शहर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button