breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड ओबीसी सेलची महिला आघाडीची कार्यकारणी जाहीर

पिंपरी | प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी महिला शहराध्यक्ष सारिका पवार यांच्या नेतृत्वाखाली आज (रविवारी) पिंपरी-चिंचवड ओबीसी महिलांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी महापौर मंगला कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवडचे प्रवक्ते फजल शेख, निरीक्षक सचिन औटे, ओबीसी शहराध्यक्ष विजय लोखंडे , युवती अध्यक्षा वर्षा जगताप, अर्बन सेलचे अध्यक्ष माधव पाटील, पिंपरी विधानसभा अध्यक्ष पल्लवी पांढरे, गंगा धेंडे, भोसरी विधानसभा मनीषा गटकळ, पी. के. महाजन, सुनील कदम, अकबर मुल्ला, अनिकेत उबाळे, प्रदीप धुमे उपस्थित होते

राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे म्हणाले की, आजच्या निवड झालेल्या महिलांनी पक्ष संघटना वाढीसाठी काम करावे. राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम आपण सर्वांनी करावे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सारिका पवार यांचे काम अतिशय उत्तम आहे. ओबीसी महिला पक्ष संघटन वाढीसाठी अतिशय चांगल्या प्रकारे त्या काम करत आहेत. याचा नक्कीच पक्षाला फायदा होईल. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर आपल्याला राष्ट्रवादीची सत्ता काबीज करू व पिंपरी-चिंचवड शहराचे भाग्यविधाते अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व काम करु.

सारिका पवार म्हणाल्या की, आज ज्या महिलांची निवड करण्यात येत आहे. त्यांनी आपले पक्षाचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवावे व अधिकाधिक महिलांना पक्षसंघटनेत सामील करून घ्यावे.

निवड झालेल्या महिलांची नावे व पद पुढील प्रमाणे पिंपरी, चिंचवड विधानसभा ओबीसी महिला अध्यक्ष पद्मा म्हात्रे, उपाध्यक्ष माधुरी सोनार, पिंपरी विधानसभा महिला अध्यक्ष रंजना दर्शले, उपाध्यक्ष प्रतिभा भुजबळ, भोसरी विधानसभा अध्यक्ष सुरेखा माळी व उपाध्यक्ष स्मिता वाघेरे तसेच उपाध्यक्ष अंकिता गोरे अशा एकूण 28 महिलांचे विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी के महाजन यांनी केले तर आभार योगेश मोरे यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button