breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अरमान कोहलीप्रकरणी एनसीबीचे छापे! २ विदेशी नागरीकांना अटक

मुंबई- ड्रग्जप्रकरणी एनसीबीने अटक केलेल्या अभिनेता अरमान कोहली प्रकरणात आज ५ ठिकाणी छापे घातले. त्यात २ परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अरमान कोहलीचे परदेशी नागरिकांसोबत ड्रग्ज कनेक्शन होते, अशी माहिती मिळाली होती. त्यावरून एनसीबीने ही कारवाई केली.

ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अरमान कोहलीला अटक केली आहे. ड्रग्स माफिया अजय सिंह उर्फ मामू हाही एनसीबीच्या ताब्यात आहे. अजय सिंहचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांसोबत संबंध असल्याचे त्याच्या व्हाट्सअप चॅटवरून उघड झाले होते. तो कोलंबिया आणि पेरू येथील ड्रग्ज माफियांच्या संपर्कात होता. या प्रकरणात एनसीबीने आज ५ ठिकाणी छापे घातले. त्यात २ परदेशी नागरिकांना अटक केली, अशी माहिती एनसीबीचे समीर वानखेडे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button