Uncategorized

नवाब मलिकांचा खळबळजनक दावा, समीर वानखेडेंचा ‘निकाहनामा’ केला जाहीर

मुंबई – मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बनावट प्रमाणपत्राद्वारे नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. त्यानंतर समीर वानखेडे यांनी त्यांचे वडील आणि त्यांचे कास्ट सर्टिफिकेट, वंशावळ, जन्म दाखला, कोतवाली रजिस्टर प्रत, कौटुंबिक फोटो शेअर करून आपण कोणत्याही कागदपत्रात छेडछाड केली नसल्याचे सांगितले. त्यानंतर आता नवाब मलिकांनी थेट वानखेडेंच्या पहिल्या लग्नाबाबत काही दावे केले आहेत.

नवाब मलिक यांनी आज सकाळी ट्विटरवर समीर वानखेडे यांच्या लग्नातील फोटो ट्विटरवरुन शेअर केला. तसेच वानखेडेंचा पहिला विवाह कधी आणि कुठे झाला याबाबतही माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी सलग काही ट्वीट केले आहेत. त्यातील एका ट्वीटमध्ये त्यांनी ‘निकाहनामा’देखील जोडला आहे. यामध्ये समीर दाऊद वानखेडे असा उल्लेख आहे. गुरुवारी ७ डिसेंबर २००८ रोजी आठ वाजता समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी यांचा निकाह अंधेरी पश्चिममधील लोखंडवाला कॉम्पलेक्स येथे झाला होता, असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच मेहर म्हणून ३३ हजारांची रक्कम घेण्यात आली होती. समीर यांची मोठी बहीण यास्मिन दाऊद वानखेडेंचे पती अजीज खानांनी यावेळी दुसरे साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली, असे नवाब मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. सोबतच दुसऱ्या एका ट्वीटमध्ये नवाब मलिकांनी म्हटले आहे की, ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी समीर दाऊद वानखेडेंचा जो मुद्दा उघड करत आहे तो त्यांच्या धर्माचा नाही. ज्या फसव्या मार्गाने त्यांनी IRS ची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे आणि एका पात्र अनुसूचित जातीच्या व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवले आहे ते मला समोर आणायचे आहे’, असे मलिकांनी म्हटले आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी काल सोशल मीडियावर दोन ट्विट केले होते. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी वानखेडेंचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की ओळखा कोण आहे?, तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी महापालिकेच्या प्रमाणपत्राचा फोटो शेअर केला आहे. या प्रमाणपत्रात समीरच्या वडिलांचे नाव ‘दाऊद क वानखेडे’ असे लिहिले आहे. ज्यामध्ये धर्माच्या जागी ‘मुस्लिम’ असे लिहिले आहे. या प्रकरणी वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप करत मी कधीही धर्म बदलला नाही, असे सांगितले. ते म्हणाले की, ‘हे सर्व आरोप खोटे आहेत. त्याने आंतरजातीय विवाह केला होता. परंतु त्याने किंवा त्याच्या पत्नीने कधीही धर्मांतर केले नाही.’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button