breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोरोनामुक्त; ७ दिवसांच्या उपचारानंतर बरे झाले

मुंबई | प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ७ दिवसांच्या उपचारानंतर अखेर कोरोनामुक्त झाले आहेत. पवारांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती खुद्द शरद पवारांनीच ट्विटरवरुन दिली. कोरोनामुक्त झाल्यानंतर पवारांनी डॉक्टर, मित्रपरिवार, सहकारी आणि शुभचिंतकांचे आभार मानले आहेत ज्यांनी पवारांच्या निरोगी आरोग्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती.

मागील २४ जानेवारी रोजी शरद पवारांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटरवरुन दिली होती. पवारांच्या ट्विटनंतर महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती. विविध क्षेत्रांतील मंडळीकडून पवारांच्या तब्येतीबद्दल विचारपूस होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शरद पवारांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर तातडीने त्यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button